
काय आहे चित्रपटांचं कथानक?
जिप्सी
‘जिप्सी’ ही आयुष्यभर दिशाहीनपणे भटकणाऱ्या एका भटक्या जमातीतील कुटुंबाची गोष्ट आहे. ‘जोत्या’ या लहान मुलाला रोज भीक मागून आणलेले खराब, शिळं अन्न खावं लागत असल्याने त्याला ताज्या-गरमागरम पदार्थांचे खूप आकर्षण आहे. पण, तसं खायला मिळत नसल्याने त्याला नेहमीच केवळ वासावरच भगवावं लागतं. यातून त्याला पदार्थांचे वास घ्यायची सवय लागते. तर, दुसऱ्या बाजूला गरोदरपणातही भटकावं लागत असल्याने त्याच्या आईचा एका ठिकाणी स्थिर होण्यासाठी संघर्ष चालू आहे. पुढे जोत्याला एका पदार्थाचा वास भारावून टाकतो. आणि शेवटी हा वासच त्याला आयुष्य बदलण्याची संधी देतो.







