
मायाचे इन्स्टाग्रामवर ५६ हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती नेहमीच रील बनवण्यात व्यस्त असायची. काही लोक तिच्या पोस्टवर अश्लिल कमेंट करायचे. पत्नीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर येणाऱ्या अश्लिल कमेंट्समुळे सिद्धार्थ नाराज होता. आत्महत्येपूर्वी लाइव्ह येत सिद्धार्थने अश्लिल कमेंट्स करणाऱ्यांना म्हटले होते की, ‘जेव्हा हे तुमच्या घरात होईल तेव्हाच तुम्हाला समजेल. मी माझे कुटुंब तुटू देणार नाही. म्हणूनच मी माझा जीव देत आहे. तसेच सिद्धार्थ म्हणाला की, ती हा व्हिडिओ पाहात असेल तर नीट ऐक, तू घटस्फोट घे. चारी मुले माझ्याकडे राहतील. रतिराम कोण आहे. मी तुझा पती आहे. मी जे म्हणेण तसेच होईल. मी लाईव्ह येत सांगत आहे मी आज मरत आहे.







