पतंजलीच्या स्वदेशी आंदोलनाला प्रत्येक भारतीयांनी सपोर्ट करायला हवा?

0
3
पतंजलीच्या स्वदेशी आंदोलनाला प्रत्येक भारतीयांनी सपोर्ट करायला हवा?


आताच्या काळात भारत जगातील सर्वात वेगाने अर्थव्यवस्था वाढवणारा देश आहे. ज्यामध्ये देशातील अनेक कंपन्यांचे मोठे योगदान आहे. खास करून ज्या कंपन्या स्वदेशीचा अवलंब करत आहेत आणि देशातच त्यांची उत्पादने तयार करत आहेत आणि लोकांना रोजगार देत आहेत. यामुळे, आपल्या देशात उत्पादन होणारे अनेक पदार्थ, सामान जगभरातील बाजारपेठांमध्ये पोहोचत आहे. स्वदेशी चळवळ म्हणजे आपल्या स्वतःच्या गोष्टींचा प्रचार करणे. ज्यामध्ये पतंजली कंपनी सर्वात महत्वाची भूमिका बजावत आहे. आज, पतंजली ही चळवळ नवीन उंचीवर घेऊन जात आहे. आयुर्वेदिक आणि देशी उत्पादनांद्वारे पंतजलीने या चळवळीत मोठे योगदान दिले आहे. बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या नेतृत्वाखाली भारतातील टॉप कंपन्यांच्या यादीत पतंजलीचा समावेश आहे. तसेच, वेगाने वाढणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातही त्यांनी मोठे नाव कमावले आहे. ज्यामुळे परदेशी कंपन्यांना कठीण स्पर्धेचा सामना करावा लागत आहे.

पतंजलीचा महसूल आणि नफा सतत वाढत आहे. देशातील आघाडीच्या एफएमसीजी कंपन्यांपैकी एक असलेल्या पतंजलीने त्यांच्या वाढीवर, रोजगार निर्मितीवर आणि स्वदेशी उत्पादनांवर विशेष लक्ष दिले आहे. त्यांच्या व्यवसाय मॉडेलमुळे आणि कमी दरांमुळे, त्यांनी एफएमसीजी आणि आयुर्वेदिक उत्पादनांच्या बाजारपेठेत स्वतःचं वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. 

आर्थिक योगदान आणि रोजगाराच्या संधी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पतंजलीचे आर्थिक योगदान खूप मोठे आहे.2023-24 मध्ये पतंजली आयुर्वेदाचे उत्पन्न 9335.32 कोटी रुपये होते. जे गेल्या वर्षीपेक्षा 23.15% जास्त आहे. त्याच वेळी, 2023 मध्ये पतंजली फूड्सचे उत्पन्न 31800 कोटी रुपये होते. यावरुन कंपनी भारताची अर्थव्यवस्था मजबूत करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. 

पतंजली नवीन रोजगार संधी उपलब्ध करून देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यांच्याकडे 10000 आरोग्य केंद्रे, 4500 वितरक असून 638795 गावांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे गावांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. तसेच,10 लाख किराणा दुकाने देखील आहेत आणि आधुनिक व्यापारी दुकानांमध्ये देखील ते उपस्थित आहेत. ज्यामुळे लहान दुकानदार आणि वितरकांना रोजगाराच्या संधी मिळत आहेत.

स्वस्त आणि स्वदेशी उत्पादने

आवळा रस आणि मोहरीचे तेल यांसारखी पतंजली उत्पादने आणि इतर अनेक दैनंदिन वापरातील वस्तू माफक दरात आहेत. आयुर्वेदिक गोष्टी या आरोग्यासाठी चांगल्या आहेत. पतंजलीची बहुतेक उत्पादने प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा स्वस्त आहेत. यामध्ये गायीचे तूप वगळता सगळ्या गोष्टी सामान्य माणसाला, खास करुन ग्रामीण भागातील लोकांना परवडतील अशा आहेत. पतंजलीचे कमी दर आणि स्वदेशी आकर्षण (मेड इन इंडिया) यामुळे किरकोळ बाजारात चांगलीच पसंती आहे. 

संस्कृती आणि देशाचा अभिमान

पतंजली आपली संस्कृती जिवंत ठेवत आहे कारण आयुर्वेद हा त्यांचा मूळ गाभा आहे. आयुर्वेद हे  आपल्या परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. कंपनीचा असा विश्वास आहे की, त्यांचे उद्दिष्ट केवळ पैसे कमवणे नाही तर आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि गरजू लोकांना मदत करणे देखील आहे. यामुळे देशाचा अभिमान वाढतो आणि स्वावलंबी होण्याची प्रेरणा मिळते.

लघु आणि मध्यम व्यवसायांना पतंजलीची मदत 

पतंजलीने अनेक लघु आणि मध्यम उद्योगांना मदत केली आहे. कंपनी स्थानिक शेतकरी आणि लहान व्यावसायिकांकडून तिच्या उत्पादनांसाठी कच्चा माल खरेदी करते. ज्यामुळे गावांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते. यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळतो आणि त्यांचे उत्पन्न वाढते. पतंजली नोएडा, नागपूर आणि इंदूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये नवीन कारखान्यांसह आपला व्यवसाय वाढवत आहे, ज्यामुळे लोकांसाठी नवीन रोजगाराच्या संधी देखील निर्माण होत आहेत.

(Disclaimer – This article is part of India Dotcom Pvt Lt’s consumer connect initiative, a paid publication program IDPL claims no editorial involvement and assumes no responsibility or liability for any errors or omissions in the content of the article.)





Source link