पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या मोदी आवास घरकुल योजनेचा शुभारंभ, रेल्वे मार्ग व रस्ते कामांचे लोकार्पण

0
18
पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या मोदी आवास घरकुल योजनेचा शुभारंभ, रेल्वे मार्ग व रस्ते कामांचे लोकार्पण


येत्या दोन आर्थिक वर्षात एकूण १० लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे. सन २०२३-२४ मध्ये मंजूर ३ लाख घरकुल लाभार्थ्यांपैकी २लाख ५० हजार लाभार्थ्यांना मोदींच्या हस्ते पहिल्या हप्त्याच्या ३७५  कोटी रुपये निधीचे वितरण होणार आहे. राज्यात केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून १७,००,७२८ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून  ७,०३,४९७ घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे. ‘सर्वांसाठी घरे’ या ध्येयपूर्तीसाठी राज्यात सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या कामात गतीमानता व गुणवत्ता आणण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या “महा आवास अभियान  २०२३-२४ अंतर्गत ७ लाख घरकुले पूर्ण करण्यात येणार आहेत.



Source link