
राजधानी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी बोलत होते. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व सोनिया गांधी या देखील यावेळी उपस्थित होत्या. ‘काँग्रेसची बँक खाती महिनाभरापूर्वी गोठवण्यात आली होती. एखादी संस्था, कंपनी किंवा कुटुंबाच्या बाबतीत असं घडलं असतं तर ते संपूनच गेले असते. इतकी मोठी कारवाई आमच्यावर झाली. मात्र, यावर कोणतंही न्यायालय, मीडिया किंवा निवडणूक आयोग बोलायला तयार नाही. सगळे गप्प बसून नाटक बघत आहेत. ही भारतातील लोकशाही आहे, असा त्रागा राहुल यांनी व्यक्त केला.







