
त्याचवेळी तिथं काहीतरी पडल्याचा आवाज येणार आहे त्यामुळे लीलाचा संशय आणखी बळवणार आहे. या खोलीत आपल्या दोघींशिवाय आणखी कोणीतरी आहे, असं लीलाला वाटणार आहे. त्यामुळे लीला संपूर्ण खोलीत शोधाशोध सुरू करणार आहे. तिकडे एका बॉक्स खाली लपून बसलेला विक्रांत आता प्रचंड घाबरला आहे. लीलाने आपल्याला पकडले तर, सगळा प्लॅन समोर येणार, असं त्याला वाटत आहे. मात्र, कालिंदी लीलाला दम देऊन आता तिथून घेऊन जाणार आहे. साखरपुड्यासाठी श्वेताला तयार करून घेऊन यायची जबाबदारी लीला आता स्वतःवर घेणार आहे. श्वेताच्या खोलीत गेलेल्या लीलाला पाहून श्वेताचे आई-वडील मात्र तिच्यावर चिडणार आहेत. यावेळी आपल्या लग्न मोडलं, म्हणून आपल्याला कोणताही दुःख झालेलं नाही, उलट मला हे लग्न करायचं नव्हतं, असं म्हणून लीला त्यांचा गैरसमज दूर करणार आहे. तर, श्वेता आणि लीलामध्ये देखील चांगली मैत्री होणार आहे.