नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, अशोक चव्हाणांचे मेहुणे भास्करराव खतगावकर यांची काँग्रेसमध्ये घरवापसी

0
17
नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, अशोक चव्हाणांचे मेहुणे भास्करराव खतगावकर यांची काँग्रेसमध्ये घरवापसी


माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, मीनल खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार अविनाश घाटे यांच्यासह अनेक नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्यांनी आज (शुक्रवार) टिळक भवन दादर येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये भाजपाचा पराभव झाला होता. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर भास्करराव खतगावकर, त्यांच्या सुनबाई मीनल खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह काँग्रेसच्या अनेकांनी भाजपाचे कमळ हाती घेतले होते. तरीही नांदेडमध्ये भाजपचा पराभव झाला होता. आता हे तिघेही काँग्रेसमध्ये परतल्याने नांदेडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली आहे.



Source link