
Ahmednagar crime news : राज्यात अल्पवयीन मुली व महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत असतानाच आता ११ वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. ९ जणांनी या अल्पवयीन मुलासोबत हे कृत्य केले असून अत्याचार करणारे देखील अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.




