
या नवजात बालिकेची नोंद करण्यासाठी आशा सेविका गोकुळच्या घरी गेल्यानंतर चिमुरडी तिथे नव्हती. याची माहिती आशा सेविकेने वरिष्ठांना दिली. वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत यांनी मंगळवारी गावाला भेट दिली. गोकुळने सुरुवातील चिमुरडीचा आजारपणाने मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र नंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याने पोटच्या मुलीची हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला. आरोपीने रविवारी रात्री चिमुरडीच्या तोंडात तंबाखू दिली व तिला झोळीत झोपविले. यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर रात्रीच चिमुरडीचा मृतदेह फर्दापूर ते वाकोद रस्त्यावर खड्डा खोदून पुरला. आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







