दिव्य मराठी ओपिनियन: पोर्शे, वडील आणि मुलगा! अखेर दोष कोणाचा?

0
21
दिव्य मराठी ओपिनियन:  पोर्शे, वडील आणि मुलगा! अखेर दोष कोणाचा?


  • Marathi News
  • Opinion
  • Pune Porsche Accident Case; Bhaskar Opinion | Who Is To Blame? | Navneet Gurjar

लेखक: नवनीत गुर्जर, नॅशनल एडिटर, दैनिक भास्कर2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

१९ मे.‎ पुण्यातील कल्याणीनगर परिसर.‎ येथे राहणाऱ्या रिअल इस्टेट डेव्हलपर विशाल अग्रवाल‎यांचा अल्पवयीन (१८ वर्षांखालील) मुलगा दोन‎दुचाकीस्वार अभियंत्यांना त्याच्या पोर्शे कारने चिरडतो.‎ परिणामी मुलगा बालगृहात. वडील तुरुंगात. आजोबांनाही‎अटक.‎ अखेर असे का घडले? असे घडतेच का?‎ दोष त्या वेगवान, महागड्या कारचा आहे का? दारूच्या‎नशेत धुंद गाडी चालवणाऱ्या त्या मुलाचा आहे का? की‎आपल्या अल्पवयीन मुलाच्या हट्टाला बळी पडून पोर्शेच्या‎किल्ल्या देणाऱ्या त्या बापाचा?‎ श्रीमंत बापाची मुलं अशीच असतात, असं सहज म्हणता‎येईल. पैशांच्या नशेत धुंद. बेदरकार. बेधडक…‎ आणि बऱ्याच प्रमाणात क्रूरदेखील.‎

असे म्हणता येईल की, श्रीमंत बापाला काही फरक पडत‎नाही. मुलाला वाचवण्यासाठी तो कधी ड्रायव्हरला विकत‎घेतो, कधी डॉक्टरांना रक्ताचे नमुने फेकण्यास भाग पाडतो.‎तसेच पोलिस, न्याय व्यवस्था इ. विकत घेण्याचाही प्रयत्न‎करतो. खरे आहे, असे अनेकदा घडते. कोणी आपल्या‎हेतूत यशस्वी होतो, कोणी अयशस्वी.‎

हे छायाचित्र पबमधील सीसीटीव्ही फुटेजचे आहे. अपघातापूर्वी अल्पवयीन मित्रांसोबत दारू पिऊन मद्यधुंद होत कारमधून निघाला. त्याने 90 मिनिटांत 48 हजार रुपयांचे बिल भरले.

प्रश्न असा आहे की, या संपूर्ण समस्येचे मूळ काय आहे?‎त्या बापाने आपल्या अल्पवयीन मुलाला गाडी नेण्यास मनाई ‎‎केली नसेल का?‎ केली असेलच. पण, आजची तरुण होणारी मुले कुठे ‎‎ऐकतात? वडिलांनाही मुलगा आणि त्याच्या मित्रांसमोर‎कंजूष म्हणून घ्यायचे नाही. आजच्या पिढीने त्यांना जुन्या ‎‎विचारांचे म्हणत चिडवावे, असेही त्यांना वाटत नाही.‎

त्यांना संकोच वाटतो की, त्यांची मुले असे म्हणू लागतील‎की त्यांचे वडील सडक्या नियम आणि तत्त्वांच्या आंधळ्या ‎‎गल्लीत हरवले असतात.‎ या सगळ्याचा विचार करून वडिलांना गाडीची किल्ली ‎‎अल्पवयीन मुलाला द्यायला भाग पडते.‎

मुलांच्या नजरेत ‘पुरोगामी’ म्हणवण्याची इच्छा त्यांना हे‎सर्व करायला लावते.‎ पण, नंतर वडिलांचे गांभीर्य समोर येते. ते ड्रायव्हर सोबत ‎‎घेऊन जाण्याच्या अटीवर किल्ली देतात, मात्र दारूच्या नशेत ‎‎असलेला मुलगा ड्रायव्हरला पाठीमागे बसवून गाडीचा‎भरधाव पळवतो आणि निष्पापांचा जीव जातो.‎

घटनास्थळी लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये एक पोर्शे भरधाव वेगाने जात असल्याचे दिसून आले.

अखेर मग यावर उपाय काय?‎ वयाच्या सोळा किंवा सतराव्या वर्षी ओळखीचे सगळे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अंगावरच्या कपड्यांसारखे घट्ट होतात, हे खरे.‎ जीवनाच्या तहानेने ओठ कोरडे पडतात.‎ लहानपणी सप्तऋषींच्या रूपात पाहत दुरूनच नमस्कार‎करावा लागतो, त्या आकाशातील ताऱ्यांना जवळ जाऊन‎स्पर्श करण्याची, नव्हे, खिशात ठेवण्याची इच्छा होते.‎

आजूबाजूला आणि दूरवर हवेत इतके निषेध, इतके‎नकार आणि इतके विरोध आहेत की श्वासात आग उफाळू‎लागते. तरुण मनाची हीच आग वडील आणि आजोबांना‎हतबल बनवते आणि कधी कधी रस्त्यावरून चालणाऱ्या‎निष्पापांचे बळी जाण्यालाही कारण ठरते.‎

असे झाले पाहिजे की, वडिलांनी आपला कडकपणा‎कायम ठेवावा. पालकांच्या या शिस्तीची खिल्ली‎उडवण्यापेक्षा किंवा तो आपला अपमान समजण्यापेक्षा‎मुलांनी परिस्थितीचे गांभीर्य समजून घेतले पाहिजे.‎ अशा अपघातांना रोखण्याचा उपाय केवळ मुले आणि‎वडील यांच्यातील गंभीर समजूदारपणातूनच निश्चितपणे‎निघू शकतो.‎ पोलिस, प्रशासन, पोलिस ठाणे हे सगळेच पुरावे तयार‎करणे आणि ते नष्ट करण्यात व्यग्र आहेत.‎

तेथून कोणत्याही प्रकारच्या उपायाची कल्पना करणे‎निरर्थकच वाटते.‎ एकूणच पुण्यातील ही घटना देशभरातील वडिलांसाठी‎आणि त्यांच्या तरुण होणाऱ्या मुलांसाठी एक धडा आहे.‎ ही एक शिकवण आहे…‎ आणि एका मोठ्या मर्यांदेपर्यंत लक्ष्मणरेषादेखील.‎



Source link