‘थोडं तुझं आणि थोडं माझं’मधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतेय शिवानी सुर्वे; पोस्ट शेअर करत झाली भावूक! म्हणाली…

0
17
‘थोडं तुझं आणि थोडं माझं’मधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतेय शिवानी सुर्वे; पोस्ट शेअर करत झाली भावूक! म्हणाली…


अभिनेत्री शिवानी सुर्वे हिने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तिने लिहिले की, ‘१२ वर्षांपूर्वी स्टार प्रवाह परिवारा सोबत एक प्रवास सुरु केला होता जो माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा टप्पा ठरला. “देवयानी”ला तुम्ही भरभरून प्रेम दिलं, आपलंस केलं, आज पर्यंत मनात ठेवलं. आज पुन्हा एक नवीन प्रवास सुरू करते आहे स्टार प्रवाह बरोबर, ‘थोड तुझं आणि थोड माझं’ या मालिकेमधून मी येणार आहे तुम्हाला भेटायला. या ‘मानसी’वर सुद्धा असंच भरभरून प्रेम करा आणि मला खात्री आहे की, ‘मानसी’सुद्धा तुमचं मन नक्की जिंकेल. तुमच्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद कायम राहुद्यात’.



Source link