
त्याने आधी माझ्या स्तनांना स्पर्श केला…
यानंतर सोनल म्हणाली, ‘मी त्या शूटिंगचा भाग नव्हते, तरी कास्टिंग डायरेक्टरने मला काही आउटफिट्स ट्राय करायला सांगितले. यानंतर त्याने जबरदस्तीने माझ्या स्तनांवर क्रीम लावले. त्याच्या या कृतीने मी खूप घाबरले. ही फक्त पहिलीच घटना होती. यानंतर, त्याने रात्री जबरदस्तीने माझ्या खोलीत प्रवेश केला आणि रातोरात इंडस्ट्रीची सुपरस्टार बनवण्यासाठी तंत्रविद्या शिकवण्याचे बोलू लागला. तो म्हणाला की, मला ही तंत्रविद्या त्याच्यासोबत कपड्यांशिवाय करावी लागेल. मला पूर्ण नग्न अवस्थेत मंत्र जप करावा लागेल. तो जे काही बोलेले ते करावे लागेल. त्याने माझ्यावर जबरदस्ती करण्याच्फ्हा प्रयत्न करत, माझे कपडे काढण्याचा प्रयत्न केला. पण, त्यावेळी मी कसे तरी स्वतःला वाचवले आणि तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. मी सरळ एका मॉडेलच्या खोलीत गेले, जिथे तिची आई देखील तिच्यासोबत होती.’ या संपूर्ण घटनेनंतर सोनल वेंगुर्लेकर हिने राजा बजाज यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.






