
व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनने वेधले लक्ष
हेमांगीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करत, “प्रत्येक आईचे आपल्या मुलांवर प्रेम असते. ते दाखवण्याच्या पद्धती वेगळ्या असतील पण मुल वाढवताना ती जे जे करते ते जगात कुणीच करू शकत नाही. पण जेव्हा हीच मुले मोठी होऊन अभिनय क्षेत्रासारखी जरा हटके, वेगळी वाट निवडतात ना तेव्हा त्या मुलांसोबत त्या आईचा ही स्ट्रगल सुरु होतो! हा व्हिडीओ पाहताना माझ्या आईचा सगळा struggle, तिचे कष्ट, तिने केलेला त्याग, लोकांचे सोसलेले टोमणे, घरातल्याच लोकांची पत्करलेली नाराजी, उघडउघड कधीच नाही पण नकळतपणे माझ्यात रूजवलेलं धैर्य, बळ आणि आज माझ्याबद्दल बोलताना तिचा भरून आलेला ऊर पाहून अत्यानंद झाला आणि माझा बांध फुटला! (Screen वर दिसणारं सगळंच scripted नसतं!)” असे म्हटले आहे.
वाचा: विकेंडला सिनेमा पाहण्यासाठी जाताय? मग जाणून घ्या ‘श्रीकांत’ची पहिल्या दिवसाची कमाई