‘तारक मेहता’ फेम गोगीने गुरुचरण यांच्या बेपत्ता होण्यावर दिली प्रतिक्रिया, शेवटचे बोलणे काय झाले?

0
12
‘तारक मेहता’ फेम गोगीने गुरुचरण यांच्या बेपत्ता होण्यावर दिली प्रतिक्रिया, शेवटचे बोलणे काय झाले?


गेल्या १४ वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करणारी लोकप्रिय मालिका म्हणून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ओळखली जाते. या मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते गुरुचरण सिंह हे गेल्या ६ ते ७ दिवसांपासून बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. दिल्ली पोलीस त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांच्या अशा अचानक गायब होण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. आता मालिकेतील गोगी म्हणजे ‘तारक मेहता’ मधील समय शाहने गुरुचरण यांच्या बेपत्ता होण्यावर प्रतिक्रिया दिली असून त्यांचे शेवटचे बोलणे काय झाले? हे सांगितले आहे.



Source link