ठाण्यात मनसेचे नेते अविनाश जाधव यांची शिंदे गटावर टीका

0
2
ठाण्यात मनसेचे नेते अविनाश जाधव यांची शिंदे गटावर टीका


Avinash Jadhav : ठाणे : ठाण्यात मनसेचे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी एक वक्तव्य केले आहे. ज्यामध्ये त्यांनी दावा केला आहे की, येत्या निवडणूकीत शिंदे गटाचे पानीपत होणार आहे. तसेच ठाकरे बंधू एकत्र येण्याविषयी देखील ते सकारात्मक आहेत. अविनाश जाधव काय म्हणाले वाचूया.

अविनाश जाधव हे मनसेच्या आक्रमक फळीतील नेत्यांपैकी आहेत. ठाणे महापालिकेची निवडणूक येत्या काही महिन्यांत होण्याची शक्यता आहे. ठाणे महापालिकेने निवडणूकीपूर्वी प्रारुप प्रभाग रचना तयार करुन प्रसिद्ध केला आहे. या रचनेविषयी आता भाजपपाठोपाठ मनसेने देखील टीका केला आहे. अविनाश जाधव यांनी आरोप केला की, प्रारुप रचना ही २०१७ ची काॅपी पेस्ट आहे. अधिकाऱ्यांनी कोणतीही मेहनत न करता तशीच्या तशी सादर केली आहे. घोडबंदर भागात नागरिकरण वाढल्याने तेथील नगरसेवक वाढतील असे अपेक्षित होते. परंतु तसे झालेले नाही. प्रारुप रचना जशीच्या तशी ठेवली फक्त मतपेट्या तशाच ठेवू नका, तेवढे उपकार आमच्यावर करा.. अन्यथा त्याच मतपेट्या बसवून जेवढी मत आहेत, तेवढे घेऊन याल असे म्हणत जाधव यांनी टीका केला.

वाहतुक कोंडी महत्त्वाचा मुद्दा

ठाण्यात वाहतुक कोंडी हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. ठाण्याहून फाऊंटनला जाण्यासाठी तब्बल अडीच ते तीन तास लागतात. मेट्रोचे काम तसेच्या तसे आहे. निवडणूका आल्यावर केवळ आश्वासने दिली जातात. मेट्रोची कामे कुठेही पूर्ण होताना दिसत नाही. ठाण्याहून अंबरनाथला जाण्यासाठी साडेतीन तास लागतात. शिळफाट्यावर पूर्णपणे कोंडी असते. ठाणेकरांना पाण्याचे धरण आलेले नाही. ज्या ठिकाणी धरणाचा आराखडा बनविण्यात आला. तेथील आसपासच्या जागा नगरसेवकांनी त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर विकत घेऊन तिथला बाजारभाव वाढवून ठेवला आहे. ठाण्यात नगरसेवक नसल्याने निधी वाटपात भ्रष्टाचार झाला आहे. हे मुद्दे निवडणूकीतील महत्त्वाचे मुद्दे असतील असे जाधव यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

ठाकरे बंधूंबाबत उत्साह- नागरिकांमध्ये शिंदे गट (Eknath Shinde) आणि भाजपच्या नगरसेवकांविषयी प्रचंड राग आहे. नागरिक यावेळेला त्या-त्या नगरसेवकांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढविण्याबाबत नागरिकांमध्ये उत्साह आहे. त्यामुळे शिंदे गटाचे पानीपत झाल्याशिवाय राहणार नाही.

म्हणून शिंदे गटाचे पानीपत होणार

शिंदे गटाचे पानीपत होणार कारण, शिंदे गटाला त्यांचा मतदारच माहीत नाही. ते ठाकरेंपासून वेगळे झाल्यानंतर त्यांनी कधीच एकट्याने निवडणूक लढविली नाही. त्यांनी एकट्याने निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला. तर उद्धव ठाकरे यांचा मतदार हा त्यांच्यासोबत आहे. पण शिंदे यांच्यासोबत असलेला मतदार हा भाजपचा तर नाही ना? हे पाहणे महत्त्वाचे आहे. शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नगरसेवक, पदाधिकारी नेले पण मतदार घेऊन जाऊ शकले नाही, असेही अविनाश जाधव म्हणाले.





Source link