Swapnil Joshi New Movie : प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी लवकरच ‘जिलबी’ या मराठी चित्रपटात दिसणार आहे. पहिल्यांदाच तो एका मनोरंजक भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आपल्या या वेगळ्या व्यक्तिरेखेबद्दल माहिती देताना तो म्हणाला की, ‘जिलबी’मध्ये तो पहिल्यांदाच एन्काउंटर स्पेशालिस्टच्या भूमिकेत दिसणार आहे. स्वप्नील जोशी म्हणाला की, ‘जिलबी’च्या माध्यमातून पोलिसांची दुनिया पहिल्यांदाच मराठी सिनेमात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात मी एका एन्काउंटर स्पेशालिस्टची भूमिका साकारत आहे, जो दिसायला कणखर वाटतो, पण त्याच्या आत बऱ्याच गोष्टी सुरू आहे, ज्या लगेच दिसत नाहीत.’