
मुंबईतील बीकेसी येथे उभारण्यात आलेल्या नीता अंबानी कल्चरल सेंटरला नुकताच एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्ताने तिथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सर्व जबाबदारी स्वत: नीता अंबानी यांनी साभांळली होती. या कार्यक्रमाची सुरुवात करताना नीता अंबानी यांनी मराठीतून संवाद साधला.’नमस्कार मंडळी कसे आहात?’ असे त्या म्हणाल्या. या कार्यक्रमातील सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये नीता अंबानी या झिंगाट गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.