ज्योती मल्होत्राने ‘ती’ चूक करुन स्वत:साठीच खणला खड्डा, ‘या’ कारणांमुळे बळावला संशय!

0
50
ज्योती मल्होत्राने ‘ती’ चूक करुन स्वत:साठीच खणला खड्डा, ‘या’ कारणांमुळे बळावला संशय!


Jyoti Malhotra: मागील अनेक दिवसांपासून ज्योती मल्होत्राच्या हालचालींवर गुप्तचर यंत्रणेचं लक्ष होतं. ती काय करते? कुठे जाते? कोणासोबत तिचे जास्त संपर्क आहेत अशा अनेक गोष्टीवर लक्ष ठेवलं जात होतं. तसंच ती मागील काही दिवसात कुठे गेली होती? यासंदर्भातली देखील माहिती घेतली.. आणि त्यानंतर ज्योतीला अटक करण्यात आली. दरम्यान अशी कोणती कारणं होती ज्यामुळे भारतीय तपास यंत्रणांचा ज्योतीवरील संशय बळावला होता? जाणून घेऊया.

कमी कमाई आणि लॅविश लाईफस्टाईल

भारताशी गद्दारी करत ज्योती मल्होत्रानं देशाची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवली. त्यामुळे तिला अटक करण्यात आली असून तिची कसून चौकशी सुरूय..ज्योतीनं 2 वर्षात तिनदा केलेला पाकिस्तानचा दौरा आणि कमी इनकम असतांना तिती लॅवीश लाईफ अशा अनेक कारणांमुळे ती गुप्तचर यंत्रणांच्या टार्गेटवर आली होती..

कोणत्या कारणांमुळे ज्योतीवर संशय?

ज्योती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाकिस्तानचं गुणगाण गात असायची. ज्योती मल्होत्रा काही दिवसांपूर्वी बाली येथे गेली होती. ज्योती मल्होत्रा बालीला असताना तिच्यासोबत एक पाक अधिकारी होता. पाकिस्तानमध्ये असताना तिनं पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज शरीफशी संपर्क साधला होता. ज्योतीची दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाशी मैत्री होती. पाकिस्तानी लष्कर आणि उच्च अधिकाऱ्यांशी तिचे संपर्क होते. तसंच पाकिस्तान आणि चीनचा व्हिसा लगेच मिळत नाही. व्हिसा घेण्यासाठी मोठी प्रोसेस असते. पण ज्योती मल्होत्राला व्हिसाही लगेच मिळाला. याशिवाय ती लग्जरी जीवन जगत होती. या सर्व गोष्टींमुळे तपास यंत्रणांना ज्योतीवर संशय आला आणि ती रडारवर आली.

पाकिस्तानी अधिका-यांच्या संपर्कात 

पाकिस्तानचा दौ-यात तिची ज्या पाकिस्तानी अधिका-यासोबत ओळख होती. तो अधिकारी भारताच्या पाकिस्तानी उच्चालयात देखील होता. तसंच त्याच्यासोबतचे ज्योतीचे पाकिस्तानमधील फोटो देखील समोर आले आहेत. तसंच त्या पाकिस्तानी अधिका-याचा पहलगाम हल्ल्यानंतर एक केक घेऊन जातांनाचव्हिडिओ समोर आला होता. त्यामुळे पाकिस्तान ते दिल्लीपर्यंत पाकिस्तानी अधिका-यांच्या संपर्कात ज्योती मल्होत्रा होती.

पर्यटकांनाच दोषी ठरवलं 

यूट्यूबर गुप्तहेर ज्योती मल्होत्राचा नवा व्हिडिओ समोर आलाय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. या हल्ल्यानंतर ज्योती मल्होत्रानं या घटनेसाठी पर्यटकांनाच दोषी ठरवलं होतं. तसंच पहलगाम हल्ल्याच्या आधी ज्योतीनं पहलगाममध्ये गेल्याची देखील माहिती आहे.

विविध देशांचे दौरे

ज्योती मल्होत्रा ही हरियाणाच्या हिसारमध्ये राहत होती. कोरोना काळात तिनं तिचं यूट्यूब चॅनेल सुरू केलं. सुरुवाती ती स्थानिक व्हिडिओ अपलोड करत होती. मात्र, नंतर तिनं चीन, थायलंड, पाकिस्तान, भूतानचे दौरे केले.

कारागृहाच्या 4 भिंतीआड काढावं लागणार आयुष्य

ज्योती मल्होत्राला अटक केल्यानंतर तिचे एक-एक कारनामे आता समोर येऊ लागले आहेत. तिनं कशापद्धतीनं भारताविरोधात कट रचण्यात पाकिस्तानला मदत केली. पाकड्यांनी दिलेल्या पैशांवर ज्योती आतापर्यंत लॅवीश लाईफ जगली मात्र, आता कारागृहाच्या चार भिंतीआड गद्दार ज्योतीला आपलं आयुष्य काढावं लागणार यात शंका नाही.





Source link