
Gym trainer murdered businessman’s wife : कानपूरमध्ये जिम ट्रेनर विमल सोनीने चार महिन्यांपूर्वी शेअर बिझनेसमन राहुल गुप्ता यांच्या ३२ वर्षीय पत्नी एकताचे अपहरण करून तिची हत्या केली होती. जिम ट्रेनर विमल सोनी याला ओळखणारे लोक, त्याच्याकडून आरोग्यविषयक टिप्स घेणारे अधिकारी आणि खेळाडू यांनी स्वप्नातही विचार केला नसेल की, तो इतक्या थंड डोक्याने कुणाची तरी हत्या करू शकतो. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकताच्या अपहरणापूर्वीच त्याने हा कट रचला होता. अजय देवगणचा दृश्यम आणि दृश्यम २ हे चित्रपट त्याने २२ वेळा पाहिले होते. एकताची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह दफन करण्यासाठी विमलने डीएम कॅम्पसची जागा निवडली. ज्या ऑफिसर्स क्लबमध्ये अधिकारी रोज खेळायला यायचे, तिथे एकताचा मृतदेह दफन करण्यात आला.








