जागतिक पुस्तक दिन विशेष: लेखकांना छळणारा हिटलर, युद्धात पुस्तक वाचणारा मुलगा अन् ग्रंथ प्राणपणानं जपणारे बाबासाहेब!

0
15
जागतिक पुस्तक दिन विशेष:  लेखकांना छळणारा हिटलर, युद्धात पुस्तक वाचणारा मुलगा अन् ग्रंथ प्राणपणानं जपणारे बाबासाहेब!


मनोज कुलकर्णी । छत्रपती संभाजीनगर2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

दुसऱ्या महायुद्धात उद्धवस्त दुकानाबाहेर पुस्तक वाचणारा मुलगा. वॉशिंग्टन डी. सी.च्या लायब्ररी ऑफ काँग्रेसमधला फोटो.

जगभरात 23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो. वाचन, प्रकाशन आणि कॉपीराइट व्यवसायाला बळकटी देण्यासाठी या दिवसाचं आयोजन केलं जातं. त्यासाठी युनेस्को (UNESCO) अर्थातच संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने पुढाकार घेतला आणि 23 एप्रिल 1995 रोजी पहिला जागतिक पुस्तक दिन साजरा झाला.

विशेष म्हणजे या दिवसाचं निमित्त साधून युनेस्को एका वर्षासाठी पुस्तकाच्या जागतिक राजधानीची निवडही करते. यंदा 2024 मध्ये स्ट्रासबर्ग या शहराची जागतिक पुस्तक राजधानी म्हणून निवड केली गेलीय.

खरे तर लेखक मिगुएल डी. सर्व्हंटेस यांच्या सन्मानाप्रित्यर्थ



Source link