
महापौर निवडणूक प्रकरणी कोर्टात मंगळवारी सुनावणी झाली. न्यायाशीशांनी वकील आणि पर्यवेक्षकांना बॅलेट पेपर दाखवत म्हटले की, ज्या ८ बॅलेट पेपर्संना अवैध घोषित केले होते ती सर्व मते कुलदीप कुमार यांना पडली होती. न्यायालयाने म्हटले की, निवडणूक अधिकारी अनिल मसीह यांनी या मतपत्रिकांवर क्रॉस मार्क केले होते. न्यायालयाने त्यांना विचारले की, जर काहीच गडबड नव्हती तर ही मते अवैध घोषित का केली? यावर अनिल मसीह यांच्या वकिलांनी म्हटले की, वोटिंग दरम्यान वातावरण बिघडले होते. त्यामुळे अनिल मसीह यांना वाटले की, हे लोक बॅलेट पेपर्स घेऊन जात आहेत.







