
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला एका मुलाला मारहाण करताना दिसत आहे. हे प्रेमीयुगुल चायनीज खात असताना ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. त्या मुलाची आई तिथे आली आणि तिने मुलाला आणि मुलाच्या मैत्रिणीला मारहाण करायला सुरुवात केली. शुक्रवारी (२ मे) उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये, एका २१ वर्षीय तरुणाला आणि त्याच्या १९ वर्षीय मैत्रिणीला चाऊमीन खाताना दिसल्याने मुलाच्या पालकांनी सार्वजनिकरित्या मारहाण केली. व्हायरल व्हिडिओ पहा.
#कानपुर मां ने बेटे और बेटे की प्रेमिका को साथ पकड़ा बीच सड़क कर दी पिटाई..
लड़के की मां ने बेटे की प्रेमिका को बीच सड़क जमकर पीटा,बीचब चाव कर थे बेटे की भी हुई पिटाई, गुजैनी थाना क्षेत्र के राम गोपाल चौराहे की घटना ।#kanpur #news #sirfsuch pic.twitter.com/Rh9vopObhz
— kur Ankit Singh (@liveankitknp) May 2, 2025
गुजैनी पोलीस स्टेशन परिसरातील रामगोपाल चौकात ही घटना घडली. रोहित आणि त्याची मैत्रीण काहीतरी खात असताना तिच्या आईवडिलांना त्यांचे नाते मान्य नव्हते, ते तिथे आले आणि त्यांनी दोघांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. कोणीतरी हा व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये कैद केला जो आता व्हायरल होत आहे.
व्हायरल क्लिपमध्ये काय?
व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये रोहितची आई स्कूटरवरून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांनाही मारहाण करताना दिसत आहे. ती मुलीचे केस धरून असताना, ये-जा करणारे दोघे वेगळे करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. दरम्यान, रोहितचे वडील त्याला शिव्या देताना दिसतात.
पोलिसांनी केली कारवाई
स्थानिक पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “पोलिसांनी समुपदेशनानंतर दोन्ही पक्षांना वेगळे केले आहे. पुढील आवश्यक कायदेशीर कारवाई केली जात आहे.” गुजैनी पोलिस स्टेशनच्या प्रभारींनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.