
Pune kamala nehru hospital news : पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात दहशतवादी घुसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर खळबळ उडाली आहे. पोलिसांचे पथक दवाखान्यात पोहोचले असून तपास सुरू आहे. त्यांनी येथे आलेल्या नागरिकांना रुग्णालया बाहेर काढण्यास सुरुवात केली असून यामुळे दवाखान्यात गोंधळ उडाला होता. मिळालेल्या माहितीनुसार या दवाखान्यात तीन संशयती आले होते. या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जात आहे. पुणे पोलिसांनी दहशतवादी घुसल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. असे असले तरी सध्या रुग्णालयाबाहेर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या सोबतच राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) व एटीएसचे पथक देखील रुग्णालयात पोहोचले असल्याची माहिती आहे.







