
अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता राजकुमार राव मुख्य भूमिकेत असणारा ‘मिस्टर अँड मिसेस माही’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात क्रिकेट वेड्या कपलची गोष्ट दाखवण्यात आली आहे. तसेच त्यांचा रोमॅन्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. जान्हवी आणि राजकुमार यांची भट्टी जमलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरने सर्वांचे लक्ष वेधले आहे.







