
मद्यधोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात असतानाच त्यांच्या सरकारमधील एका मंत्र्याने बुधवारी राजीनामा दिला आहे. केजरीवाल यांच्या गैरहजेरीत समाजकल्याण मंत्री राजकुमार आनंद यांनी राजीनामा दिल्याने आम आदमी पार्टीला जोरदार धक्का बसला आहे.
नवी दिल्ली : मद्यधोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात असतानाच त्यांच्या सरकारमधील एका मंत्र्याने बुधवारी राजीनामा दिला आहे. केजरीवाल यांच्या गैरहजेरीत समाजकल्याण मंत्री राजकुमार आनंद यांनी राजीनामा दिल्याने आम आदमी पार्टीला जोरदार धक्का बसला आहे.
पटेलनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले आनंद यांनी पत्रपरिषद घेऊन ही माहिती दिली. मंत्रिपदासोबतच त्यांनी पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. जाटव समुदायाचे नेते असलेल्या आनंद यांनी दिल्ली विधानसभेच्या 2020च्या निवडणुकीत 61 टक्के मते घेतली होती. पक्षात दलित समुदायाला योग्य स्थान मिळत नसल्याचा आरोपही आनंद यांनी केला आहे.








