केंद्र सरकार अश्लील आणि आक्षेपार्ह सामग्री दाखवणाऱ्या अॅप्सवर बंदी घालत आहे. सरकारने उल्लू, अल्टसह अनेक अॅप्सवर बंदी घातली आहे आणि इंटरनेट सेवा प्रदात्यांना भारतातील (india) या अॅप्स बंद करण्याचे (ban) आदेश दिले आहेत.
सरकारचे म्हणणे आहे की हे अॅप्स अश्लील सामग्री दाखवत होते, ज्याचा समाजावर वाईट परिणाम होत होता आणि ते कायद्याच्या विरुद्ध देखील आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने इंटरनेट सेवा प्रदात्यांना अश्लील सामग्री दाखवल्यास हे अॅप्स त्वरित ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत.
अहवालानुसार, सरकारने असे एकूण 25 अॅप्स आणि वेबसाइट्स ओळखले आहेत जे आक्षेपार्ह आणि अश्लील सामग्री असलेल्या जाहिराती दाखवत होते.
या अॅप्समध्ये अल्ट बालाजी (alt balaji), उल्लू (ullu), बिग शॉट्स अॅप, डेसिफ्लिक्स, बूमएक्स, नवरासा लाईट, गुलाब अॅप, कंगन अॅप, बुल अॅप, जलवा अॅप, वॉव एंटरटेनमेंट, लूक एंटरटेनमेंट, हिटप्राइम, शोएक्स, सोल टॉकीज, हॉटएक्स व्हीआयपी, मूडएक्स, मोजफ्लिक्स, फेनिओ, ट्रायफ्लिक्स, अड्डा टीव्ही, निऑनएक्स व्हीआयपी, हलचल अॅप, फुगी आणि इतर नावे आहेत.
सरकारने या अॅप्सवर माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या कलम 67 आणि 67अ, भारतीय न्याय संहिता, 2023 च्या कलम 294 आणि अश्लील प्रतिमा प्रतिबंधक कायदा, 1986 च्या कलम 4 अंतर्गत कारवाई केली आहे.
या कायद्यांनुसार, महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी, सामाजिक मूल्ये बिघडवणारी किंवा अश्लीलता पसरवणारी कोणतीही सामग्री थांबवणे आवश्यक आहे आणि त्याचे उल्लंघन करणे हा दंडनीय गुन्हा आहे.
हेही वाचा