
Canada elections : अब्जाधीश एलन मस्क यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्याबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे. आगामी निवडणुकीत ट्रुडो पराभूत होतील, असा मस्क यांनी दावा केला आहे. अमेरिकेत नुकतीच राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पडली, ज्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे मस्क यांनी ट्रम्प यांच्या प्रचारातही मोठी भूमिका बजावली होती. ट्रम्प यांनीही आपल्या पहिल्या भाषणात मस्क यांचा अनेकदा उल्लेख केला होता.








