काहींनी राजकारण करताना गुन्हेगारीला बळ दिले, मुख्यमंत्र्यांसमोरच सुरेश धस यांची जोरदार टोलेबाजी, पंकजा मुंडेंवरही निशाणा

0
2
काहींनी राजकारण करताना गुन्हेगारीला बळ दिले, मुख्यमंत्र्यांसमोरच सुरेश धस यांची जोरदार टोलेबाजी, पंकजा मुंडेंवरही निशाणा

सुरेश धस म्हणाले, मी काहीही बोललं की, बीड जिल्ह्याची बदनामी होतेय असं काहीजण म्हणतात. या जिल्ह्याने क्रांती सिंह नाना पाटील, बबनराव ढाकणे दिले,प्रमोद महाजन यांच्यासारखा उंचीचा माणूस निवडून दिला. गोपीनाथव मुंडे यांच्यासारखा पहाडासारखा माणूस दिला.आज ज्या जमिनीवर या कामाचा शुभारंभ होतोय,प्रकल्प उभारतोय ती जमीन संरक्षण विभागाकडे जाणार होती,पण जॉर्ज फर्नाडीस संरक्षणमंत्री असताना मुंडे साहेबांनी ही जमीन सोडवून घेतली अशी आठवणही धस यांनी सांगितली.

Source link