
मंड्या जिल्ह्यातील प्रसिद्ध कल्लभैरवेश्वर मंदिरात (Kalabhairaveshwara Swamy Temple) दलितांच्या प्रवेशाच्या निषेधार्थ मंदिरातील मूर्ती गाभाऱ्यापासून दूर हलविण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, गावातील काही लोकांनी मंदिर उत्सवादरम्यान मंदिराच्या आवारात उत्सवाची मूर्ती वेगळी ठेवली होती. मंड्या शहरापासून १३ किमी अंतरावर हणकेरे गावात हे मंदिर आहे. दलितांच्या प्रवेशावरून वाद सुरू झाल्यानंतर सरकारी अधिकारी आणि पोलिसांनी ग्रामस्थांची बैठक घेतली. त्यानंतर दलितांना मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला.