
सिंघम अगेन
या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सिंघम अगेन’ची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. ‘सिंघम’ चित्रपटाचा पहिला भाग २०११ मध्ये प्रदर्शित झाला होता. ‘सिंघम अगेन’ हा रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या सिंघम फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट आहे. आता या चित्रपटाबाबत रोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘सिंघम अगेन’ या दिवाळीमध्ये रिलीज होऊ शकतो. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण, दीपिका पादुकोण, करीना कपूर, टायगर श्रॉफ, अक्षय कुमार, रणवीर सिंह, विकी कौशल आणि अर्जुन कपूर दिसणार आहेत.








