
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत कार्तिकने मुक्तावर अतिप्रसंग केल्यामुळे सागरने त्याला चांगलाच धडा शिकवला आहे. थेट त्याला तुरुंगात टाकले आहे. त्यानंतर तो त्याला कठोर शिक्षा देण्याचा निर्णय घेतो. दुसरीकडे मुक्ता आणि सागरमध्ये जवळीक निर्माण होत आहे. पण स्वातीचा जेव्हा विषय येतो तेव्हा तो मुक्ताशीही भांडण करताना दिसतो. स्वातीवरुन मुक्ता आणि सागरमध्येही वाद होतात. पण दोघांचा हेतू मात्र, सारखा असतो. आता मालिकेच्या आगामी भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.








