
या कार्यक्रमात बोलताना ‘कयामत से कयामत तक’ फेम अभिनेत्रीने जुही चावला हिने सांगितले की, स्ट्रगलच्या काळात शाहरुख खानकडे एकच कार होती, जी त्याने ईएमआय करून विकत घेतली होती. परंतु, त्यावेळी शाहरुख खान ईएमआय न भरू शकल्यामुळे बँकेने ती कार ताब्यात घेतली होती. ‘शाहरुख खानकडे एक जिप्सी होती, तिचा ईएमआय भरण्यासाठी तो २-३ शिफ्ट करायचा. पण, तरीही त्याच्याकडे पुरेसे पैसे जमत नव्हते. ईएमआय भरता न आल्याने बँकेने अखेर त्याची गाडी उचलून नेली होती. पण आता त्याच्याकडे बघा…’, असा एक किस्सा जुही चावलाने या कार्यक्रमात सांगितला.








