
लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोठे संघटनात्मक बदल केले आहेत. उत्तर प्रदेशचा प्रभार सांभाळणाऱ्या प्रियंका गांधी यांना हटवून त्यांच्याजागी अविनाश पांडे यांना आणले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी अविनाश पांडे यूपीमध्ये काँग्रेसचे प्रभारी असतील. तसेच सचिन पायलट यांच्यावरही काँग्रेसने मोठी जबाबदारी सोपवली आहे. सचिन पायलट यांना छत्तीसगड काँग्रेसचे प्रभारी नियुक्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर रमेश चेन्निथला यांना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी नियुक्त करण्यात आले आहे.






