ऑनलाइन गेमींगच्या नादात टॅक्सी चालकाची आत्महत्या; वांद्रे-वरळी सी लिंकवरून उडी मारून संपवलं जीवन

0
18
ऑनलाइन गेमींगच्या नादात टॅक्सी चालकाची आत्महत्या; वांद्रे-वरळी सी लिंकवरून उडी मारून संपवलं जीवन


Mumbai news : वरळी सी लिंक वरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी मध्यरात्री अशीच एक घटना उघडकीस आली आहे. मुंबईत एका कॅब चालकाने वरळी सी लिंकवर कॅब थांबवून समुद्रात उडी मारून आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे. या बाबत माहिती मिळाल्यावर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, रात्री अंधार आणि समुद्राच्या उंच लाटांमुळे मृतदेह सापडला नाही. आज सकाळी ७.३० च्या सुमारास त्याच्या मृतदेह दादर येथे सापडला. त्याचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी नायर रुग्णालयात पाठवण्यात आला, ऑनलाइन गेमिंगच्या नादातून त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.



Source link