
1 दिवसापूर्वी
- कॉपी लिंक
वाढते बिल आणि महागाईमुळे पैसा आपली सर्वात मोठी चिंता बनत आहे याकडे तुम्ही लक्ष दिले का? हे १००% खरे आहे असे दिसून आले. लोक प्रवास करताना किंवा त्यांच्या वर्कस्टेशनच्या मागे उभे असताना त्यांच्याकडे पाहा. आपल्या फोनवर एका टॅपवर बँकिंग आणि गुंतवणूक अॅप्स उपलब्ध असल्याने आपल्यापैकी बरेच जण दिवसातून अनेक वेळा आपले आर्थिक खाते तपासत असतात. उदाहरणार्थ- पावसाळ्यात लहरी हवामानामुळे आपण हवामानाचे अहवाल तपासतो. तसेच याबाबतही घडत आहे. तरुणांना त्यांच्या नियंत्रणाबाहेरील बाह्य घटकांचा सामना करावा लागत असल्याने त्यांना अधिक आर्थिक दबावांना तोंड द्यावे लागते. म्हणजे बाजारातील अनिश्चितता, नोकरीची सुरक्षा, कर्ज आणि वाढत्या घरांच्या किमतींसारखे दैनंदिन खर्च. आजकाल आपल्यापैकी बहुतेक जण आपला वेळ चिंता करण्यात घालवतात! अमेरिकेत झालेल्या अलीकडील सर्वेक्षणानुसार नोकरी गमावणारे तरुण दिवसातून किमान ४.५ तास पैशाची चिंता करण्यात घालवतात. लक्षात ठेवा, हे अर्धवेळ नोकरी करण्यासारखे आहे.पाहणीनुसार इंटरनेटमुळे तरुणांना अधिक माहिती उपलब्ध असल्याने सोशल मीडियामुळे ते सतत जगाशी स्वतःची तुलना करत असतात. अधिक माहिती असणे चांगले असले तरी माहितीने भरलेले असणे कधी कधी ताण निर्माण करू शकते. हा विषय इतका गंभीर आहे की सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ३६% लोकांनी त्यांच्या आर्थिक चिंतांमुळे झोपू शकत नसल्याचे सांगितले. जनरेशन-जी दुपारी २ ते ५ वाजेच्या दरम्यान पैशाबद्दल विचार करतात तर मिलेनियल्स आणि जनरेशन-एक्स बहुतेकदा झोपण्यापूर्वी किंवा रात्री ८ ते ११ वाजेच्या दरम्यान पैशाबद्दल चिंता करतात.पैशाचा ताण प्रेरणा देतो का? दीर्घकालीन ध्येय निर्माण करण्यास आणि साध्य करण्यास या तणावाची मदत होत असल्यास उत्तर हो असेल. परंतु ते भूतकाळातील चुका, गमावलेल्या संधींची आठवण करून देत असल्यास ते फक्त निराशेकडे नेईल, उपायांकडे नाही. आपण विसरतो की पैसा हे एक अंतहीन चक्र आहे. म्हणून पैशाचे व्यवस्थापन करणे आणि ते निर्माण करण्यास मदत करण्यासाठी एक लहान पाऊल उचलणे हळूहळू पैशाशी संबंधित चिंता दूर करेल.
व्यवस्थापन टीप :
तुम्हीही तुमचा बहुतेक वेळ पैशाबद्दल चिंता करण्यात घालवता का? हे लक्षात ठेवा. चिंता केल्याने तुमचे बिल भरणार नाही. उलट या वेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकता. लवकर बचत सुरू करा. सातत्याने बचत करा आणि नफ्याची पुनर्गुंतवणूक करा. आणि नंतर परिणाम पाहा. या सोप्या पद्धतींनी तुम्हाला दिसेल की तुमचे पैसे वेगाने वाढतील. तुमच्या चिंता आपोआप दूर होतील.