एन. रघुरामन यांचा कॉलम: आपण वृद्धांसाठी हे जग एक चांगले ठिकाण का बनवत नाही?

0
4
एन. रघुरामन यांचा कॉलम:  आपण वृद्धांसाठी हे जग एक चांगले ठिकाण का बनवत नाही?


  • Marathi News
  • Opinion
  • N. Raghuram’s Column, Why Aren’t We Making The World A Better Place For The Elderly?

8 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

शुक्रवारी रात्री इंदूर विमानतळावर मोठी गर्दी होती. ८० वर्षीय वृद्धाने बोर्डिंग गेटच्या कर्मचाऱ्याला नम्रपणे विचारले, “माझे हातपाय थरथरत आहेत, मी आधी विमानात चढू का?”सुमारे वीस वर्षीय मुलीने कर्कश आवाजात फक्त एकच शब्द बोलला – “नाही’, अन् ती दुसरीकडे पाहू लागली. जणू ती खूप व्यग्र आहे आणि काही ऑपरेशनल स्ट्रॅटेजीबद्दल विचार करत आहे. इतक्या प्रवाशांसमोर त्या वृद्ध व्यक्तीचा स्वाभिमान दुखावला गेला. म्हणून ते मान खाली घालून बाजूला शांतपणे उभे राहिले. जेव्हा त्यांचा सीट नंबर जाहीर झाला तेव्हा ते हळूहळू बोर्डिंग गेटकडे चालत गेले. ज्या मुलीने त्यांना “नाही’ असे उद्धटपणे म्हटले होते तिचा संयम सुटत चालला होता. कारण ती वृद्ध व्यक्ती मागे चालणाऱ्या इतरांसाठी अरुंद जागेमुळे अडथळा ठरत होती. वृद्ध जवळ येताच तिने त्यांना बोर्डिंग पास मागितला. त्यांच्या शरीराच्या हालचाली मंद असल्याने त्यांना वेळ लागला. त्यांनी किराणा सामानाच्या पिशवीसारखी दिसणारी प्लास्टिकची पिशवी उजव्या हातातून डाव्या हातात घेतली. प्लास्टिक बॅगच्या हँडलने त्यांच्या पांढऱ्या, सुरकुत्या पडलेल्या मनगटावर आधीच लाल ओरखडा पडला होता. त्यांनी विमानतळावरील दुकानातून आपल्या नातवंडांसाठी काही नमकीन आणि मिठाई खरेदी केली होती. मग त्यांनी बोर्डिंग पास काढण्यासाठी हळूहळू उजवा हात डाव्या शर्टाच्या खिशात घातला. बोर्डिंग पास त्या तरुणीला देण्यापूर्वीच तिने त्यांच्या हातातून तो हिसकावून घेतला आणि टेबलावर ठेवलेल्या एका छोट्या मशीनवर स्कॅन केला आणि तो परत त्यांच्या हातात खोचण्याचा प्रयत्न केला. बोर्डिंग पास घेताना त्यांचा उजवा हात हवेने पाने उडावीत तसा थरथरत होता. माझ्या लक्षात आले की त्यांचा हात पूर्वीपेक्षाही अधिक थरथरत होता. त्यांनी स्वतःसाठी लवकर बोर्डिंगची विनंती केली तेव्हाही तो असाच थरथरत होता. त्यांचा स्वाभिमान दुखावण्याची ही दुसरी वेळ होती. त्यांनी पुन्हा मान खाली घातली आणि जवळजवळ निषेध म्हणून त्यांनी त्या तरुणीकडे ढुंकूनही बघितले नाही. मग ते हळूहळू विमानाकडे चालत गेले.

विमानात ते माझ्या मागे काही अंतरावरच बसले होते. मी त्यांच्या शेजारी असलेल्या प्रवाशासोबत माझी सीट बदलली. कारण मला त्यांच्याशी बोलून शांत करायचे होते. मी बसताच त्यांचा फोन वाजला. मला अंदाज आला की तो त्यांचा नातू असावा, जो त्यांच्या आगमनाबद्दल खूप उत्साहित होता. ते वृद्ध नातवाला सांगत होते, “काळजी करू नकोस, आपण सोमवारी शाळेत जाऊ आणि तुला त्रास देणाऱ्या मुलाला ठोसा मारू.” मी विचार करत होतो की हे वृद्ध शाळेत आपल्या नातवाला त्रास देणाऱ्या लहान मुलाला कसा ठोसा मारू शकतात, जेव्हा ते त्यांचा अपमान करणाऱ्या मुलीच्या वृत्तीवर तोंडही उघडू शकले नाही. दुसऱ्या टोकावरील नातवाने विचारले, “तुम्ही हे कसे कराल, आजोबा?” म्हातारा नातवाच्या वयाचा असताना शाळेत त्याने असे कसे केले होते याची गोष्ट सांगू लागला. “ते १९५१ ची गोष्ट असावी. त्या खोडकर पण धष्टपुष्ट मुलाने माझे जेवण चोरले. मी त्याला रंगेहाथ पकडले. दुसऱ्या बाजूला असलेल्या मुलाने विचारले, “मग? “वृद्ध हळू आवाजात म्हणाले, “मी त्याचा चेहरा पाहिला आणि मला कळले की तो खूप भुकेला आहे. मी त्याला माझे जेवण अर्धे दिले. त्याने मला मिठी मारली आणि तेव्हापासून मी शाळा सोडेपर्यंत माझे रक्षण केले. “मुलगा मोठ्याने हसला आणि म्हणाला, “तुमच्या शाळेच्या दिवसांतील आणखी गोष्टी सांगा ना आजोबा…प्लीज. वृद्ध म्हणाला, “मी सांगेन, पण आता नाही, आपण रात्री भेटू.” मी काहीच बोललो नाही. मला माहीत होते की त्यांचा स्वाभिमान परतला आहे.



Source link