एक-दोन-तीन नव्हे, अभिषेक बच्चनने एकाच वेळी खरेदी केले सहा आलिशान फ्लॅट! किती पैसे मोजले ऐकलेत का?

0
21
एक-दोन-तीन नव्हे, अभिषेक बच्चनने एकाच वेळी खरेदी केले सहा आलिशान फ्लॅट! किती पैसे मोजले ऐकलेत का?


बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याने मुंबईतील बोरिवली परिसरातील ओबेरॉय रियॅल्टीच्या ओबेरॉय स्काय सिटी या प्रकल्पात १५.४२ कोटी रुपयांना सहा फ्लॅट खरेदी केले आहेत, अशी माहिती Zapkey.com या वेबसाईटकडून देण्यात आली आहे. कागदपत्रांनुसार, बॉलिवूड अभिनेत्याने ३१,४९८ रुपये प्रति चौरस फूट दराने एकूण ४,८९४ चौरस फूट रेरा कार्पेटचे हे फ्लॅट खरेदी केले आहेत. बोरिवली पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गालगत असलेल्या या इमारतीच्या ५७ व्या मजल्यावर हे सहा अपार्टमेंट आहेत. २८ मे २०२४ रोजी या सहा अपार्टमेंटची नोंदणी करण्यात आली असून, त्यात १० कार पार्किंगची सुविधा आहे.



Source link