
elon musk became fan of indian election : टेस्लाचे सीईओ आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर समर्थक इलॉन मस्क देखील भारताच्या मतदान प्रणालीचे फॅन बनले आहेत. मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत अमेरिकन निवडणूक यंत्रणेवत टीका केली आहे. मस्क यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, कॅलिफोर्नियातील निवडणुकीनंतर एका दिवसात भारताने ६४ कोटी मतांची मोजणी केली, तर १५ दिवस उलटूनही कॅलिफोर्नियात अजूनही मतमोजणी सुरू आहे. एक्सवरील एका युजरने सांगितले की, ट्रम्प यांनी आपल्या पोर्टफोलिओची विभागणी केली आहे त्यामुळं अजूनही कॅलिफोर्नियामध्ये मोजणी केली जात आहे. यानंतर आणखी एका युजरने म्हटले की, भारतातील फसवणूक हे निवडणुकीचं पहिलं ध्येय नाही. त्यामुळे एका दिवसात ६४ कोटी मतांची मोजणी पूर्ण करणं शक्य झालं.