‘ऋषभ पंतशी लग्न करणार ?’, उर्वशी रौतेलाने दिलेल्या उत्तराने चाहते हैराण

0
16
‘ऋषभ पंतशी लग्न करणार ?’, उर्वशी रौतेलाने दिलेल्या उत्तराने चाहते हैराण


भारतीय संघातील स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत कायमच चर्चेत राहिला आहे. कधी त्याच्या खेळामुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. ऋषभ हा जवळपास १५ महिन्यांनंतर आयपीएलच्या निमित्ताने मैदानात उतरला आहे. त्याने पंजाब किंग्ज विरुद्ध आयपीएल २०२४च्या दुसऱ्या सामन्यातून क्रिकेटमध्ये पुनरागम केले आहे. ऋषभचा खेळ पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. दरम्यान, ऋषभ पुन्हा एकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. त्याचे नाव अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत जोडले जात आहे. आता उर्वशीने केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.



Source link