
याआधीही घडला होता असा प्रकार
यापूर्वी भारतीय पोलीस सेवेचे (IPS) अधिकारी अरुण बोथरा यांनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) वरून परीक्षेतील गैरव्यवहाराचा आरोप केला होता. ‘एका विद्यार्थ्यानं उत्तरपत्रिकेत पैसे ठेवले आणि परीक्षकांना पासिंग मार्क्स देण्याची विनंती केली होती. बोथरा यांनी उत्तरपत्रिकेत ठेवलेल्या नोटांचं छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केलं होतं. ’आमचे विद्यार्थी, शिक्षक आणि संपूर्ण शैक्षणिक व्यवस्थेबद्दल हे चित्र बरंच काही सांगून जातं,’ अशी खंत बोथरा यांनी आपल्या पोस्टमधून व्यक्त केली होती. त्यांच्या या पोस्टवर असंख्य प्रतिक्रिया आल्या होत्या. असे प्रकार आमच्या सोबत आणि आमच्या परिचयातील लोकांसोबतही घडल्याचं लोकांनी म्हटलं होतं.







