
turkish lawmaker hasan bitmez cardiac arrest : इस्रायलला शिव्याशाप देणाऱ्या तुर्कीच्या एका खासदाराला भर संसदेच्या अधिवेशनात हृदयविकाराचा झटका आला. युद्धाचे परिणाम इस्त्रायलला भोगावे लागतील असे म्हणत असतांना ते अचानक कोसळले. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाबद्दल तुर्कीने दिलेल्या प्रतिक्रियेचाही त्यांनी निषेध केला. इस्रायल आणि हमासमध्ये सुमारे दोन महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे.








