
चेन्नईच्या दक्षिण उपनगरातील थोराईपक्कम येथे एका बांधकाम साइटजवळ सूटकेसमध्ये भरलेल्या एका महिलेचा छिन्नविछिन्न मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी २३ वर्षीय इंजिनिअर पदवीधर तरुणाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाने पोलिसांसमोर खुनाची कबुली दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला ३५ वर्षांची होती व चेन्नईच्या उत्तर भागात असलेल्या मदावुरम येथील रहिवासी होती. ही महिला सेक्स वर्कर होती. रक्ताने माखलेल्या सूटकेसमध्ये तिच्या शरीराचे तुकडे मिळाले.








