“आमच्या हातात ED-CBI येईल तेव्हा भारतीय जनता पक्ष संपलेला असेल”

0
45
“आमच्या हातात ED-CBI येईल तेव्हा भारतीय जनता पक्ष संपलेला असेल”


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घराणेशाहीवरून महाविकास आघाडीवर केलेल्या टीकेवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आमच्या हातात ईडी-सीबीआय येईल तेव्हा भाजप देशातून हद्दपार झालेला असेल. भारतीय जनता पक्ष संपून जाईल. लोहा लोहे को काटता है, हे त्यांनाच माहिती आहे असे नाही,  हे आम्हालाही माहिती आहे. ज्या दिवशी आमच्या हातात सत्ता येईल व ईडी-सीबीआयसारख्या तपास संस्था आमच्या नियंत्रणात येतील, तेव्हा फडणवीसांनी त्यांचा पक्ष वाचवून दाखवावा, असे थेट आव्हान संजय राऊतांनी दिले.



Source link