अरूंधती काटजू यांचा कॉलम: ट्रान्सजेंडर हक्कांच्या बाबतीत आपण पुन्हा मागे जात आहोत‎

0
1
अरूंधती काटजू यांचा कॉलम:  ट्रान्सजेंडर हक्कांच्या बाबतीत आपण पुन्हा मागे जात आहोत‎




‎‎‎‎‎‎‎‎दशकाहून अधिक काळ न्यायालये, केंद्र सरकार आणि ‎राज्ये ट्रान्सजेंडर हक्कांचा विस्तार करण्यासाठी एकत्र‎काम करत आहेत. पण आता केंद्र सरकार कायद्यात‎दुरुस्ती करून आम्हाला मागे नेऊ इच्छिते. 2014 मध्ये‎‘नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी विरुद्ध सरकार‎खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने ट्रान्सजेंडर व्यक्तींना‎सन्मानाने जगण्याचा हक्क असल्याचे मान्य केले होते.‎राज्यघटनेने स्व-निर्धारित लैंगिक ओळखीचे संरक्षण केले‎आहे, असे सांगून न्यायालयाने सरकारला तृतीयपंथीयांना‎मान्यता देण्याचे निर्देश दिले होते.‎ 2019 मध्ये केंद्र सरकारने ‘ट्रान्सजेंडर व्यक्ती (हक्कांचे‎संरक्षण) कायदा” मंजूर केला. या कायद्याने ‘ट्रान्सजेंडर‎व्यक्ती”ची व्यापक व्याख्या केली. त्यात किन्नर, अरावनी,‎जोगता यांसारख्या पारंपरिक ओळखी आणि‎नॉन-बायनरी व्यक्ती, जेंडरक्विअर, तसेच ट्रान्सजेंडर‎पुरुष व महिला यांसारख्या अपारंपरिक ओळखींचा‎समावेश होता. कलम 4(2) ने स्वयं-निर्धारित लैंगिक‎ओळखीचे संरक्षण केले. हे तर्कसंगत होते. आपण‎आपली लैंगिक ओळख स्वतःच ‘घोषित”‎करतो—आपली कागदपत्रे आपल्या पोशाखातून आणि‎वागणुकीतून ते दर्शवतो. आपण कोण आहोत हे घोषित‎करण्यासाठी आपल्याला सरकारी मंजुरीची गरज नसते.‎ 2019 च्या कायद्याने शस्त्रक्रिया अनिवार्य केली नाही. हे‎योग्य होते. लिंगबदल शस्त्रक्रिया महाग आहे आणि‎भारतात सहज उपलब्ध नाही. ट्रान्सजेंडर व्यक्ती‎कोणत्याही वैद्यकीय हस्तक्षेपाशिवाय ‘ट्रान्सजेंडर‎ओळख प्रमाणपत्र” आणि शस्त्रक्रियेनंतर ‘लिंग बदल”‎प्रमाणपत्र मिळवू शकत होत्या. या कायद्याने ते सर्व‎संरक्षण प्रदान केले. ते आपल्याला आपल्या ट्रान्सजेंडर‎प्रिय व्यक्तीसाठी हवे असते. सरकारने त्यांना समाजात‎सामावून घ्यावे आणि वैद्यकीय सुविधा पुरवाव्यात;‎नोकरी देणारे आणि शैक्षणिक संस्था त्यांच्याशी भेदभाव‎करू शकत नाहीत. या कायद्याने ‘राष्ट्रीय ट्रान्सजेंडर‎व्यक्ती परिषद” स्थापन केली. या कायद्याने तृतीयपंथी‎व्यक्तींना महाविद्यालये, कार्यालये आणि सरकारमध्ये‎त्यांचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी एक आराखडाही‎तयार केला. अमेरिकेत तृतीयपंथींच्या हक्कांवर हल्ले होत‎असताना भारत या मुद्द्यावर एक नेतृत्व म्हणून म्हणून‎उदयास आला.‎ गेल्या दशकात लक्षणीय बदल दिसून आले आहेत. उत्तर‎प्रदेशामध्ये तृतीयपंथी मुले आणि त्यांचे जोडीदार‎शेतजमिनीच्या वारसा हक्कासाठी पात्र ठरले. कर्नाटकने‎तृतीयपंथी व्यक्तींना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले.‎ते सनदी अधिकारी, पोलीस अधिकारी आणि‎महाविद्यालयांचे प्राचार्य बनले. माझ्या स्वतःच्या वकिली‎व्यवसायात, विधी महाविद्यालयांमध्ये तृतीयपंथी विद्यार्थी‎आहेत आणि न्यायालये व विधी संस्थांमध्ये तृतीयपंथी‎वकील कार्यरत आहेत.‎ हे हक्क वाढवण्याऐवजी केंद्र सरकार आता ते काढून घेत‎आहे. राष्ट्रीय परिषदेच्या सदस्यांशी सल्लामसलत न‎करता मंजूर करण्यात आलेल्या दुरुस्ती कायद्यानुसार‎केवळ हिजडा, किन्नर, जोगता आणि अरवणी यांनाच‎”तृतीयपंथी” मानले जाईल.‎ या दुरुस्ती कायद्याने कलम 4(2) देखील काढून टाकले‎आहे. तृतीयपंथी‎यांच्या स्व-ओळखीच्या हक्काचे संरक्षण‎करत होते. हे बदल पूर्वलक्षी प्रभावाने लागू झाले आहेत.‎त्यामुळे त्यांनी 2019 च्या कायद्यानुसार ट्रान्सजेंडर‎प्रमाणपत्र मिळवले आहे. शस्त्रक्रियेशिवाय आधार व इतर‎कागदपत्रे बदलली आहेत. ट्रान्सजेंडर व्यक्तींनी मुख्य‎प्रवाहात येण्यासाठी प्रचंड अडथळ्यांवर मात केली आहे.‎केंद्र सरकारने त्यांचे कौतुक करायला हवे. त्याऐवजी ते‎त्यांचे हक्क हिरावून घेत आहे.‎ (ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.)‎



Source link