
pm narendra modi on gurpatwant singh pannu assassination : खलिस्तानी नेता गुरपतवंत सिंग पन्नू यांच्या हत्येच्या कटात भारतीय अधिकाऱ्याचा सहभाग असल्याच्या अमेरिकेच्या दाव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आम्ही अमेरिकेने दिलेले पुरावे बघू, जर यात काही तथ्य आढळले तर मी या प्रकरणात लक्ष घालेन. मात्र, अशा घटना दोन्ही देशातील संबंध खराब करू शकणार नाही. फायनान्शिअल टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत पीएम मोदी यांनी वरील वक्तव्य केले.






