
तेजस्विनी घोसाळकर यांची पोस्ट –
लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने तेजस्विनी घोसाळकर यांनी अभिषेक घोसाळकर यांच्या फेसबूक वॉलवर एक भावनिक स्टोरी पोस्ट केली आहे. स्वर्गात असलेल्या माझ्या प्रिय नवऱ्यासाठी. मला तुमच्याबरोबर संपूर्ण आयुष्य घालवायचं होतं. परंतु,आता मला समजलं की,तुम्हीच तुमचं संपूर्ण आयुष्य माझ्याबरोबर घालवणार आहात. मला माहितेय की, तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही माझ्यावर प्रेम केलंत आणि स्वर्गातूनही माझ्यावर प्रेम करत राहशील,जोपर्यंत आपण पुन्हा एकत्र येत नाही. लग्नाच्या वाढदिवसाच्या स्वर्गीय शुभेच्छा. मला तुमची फार आठवण येते.







