
बजेटच्या हलवा समारंभात एकही दलित, आदिवासी नाही!
‘देशातील दलित आणि मागासवर्गीयांना कुठंही स्थान मिळत नाही. त्यांना कॉर्पोरेट इंडिया, नोकरशाही आणि सरकारमध्ये स्थान दिलं जात नाही. बजेटच्या हलवा समारंभाचं चित्रही त्यांनी दाखवलं. या चित्रात एकही दलित, आदिवासी आणि ओबीसी अधिकारी दिसत नाही. बजेटची खीर वाटली जात आहे, पण देशाला मिळत नाही, असं ते म्हणाले. ‘जात जनगणनेचा मुद्दा अर्थसंकल्पात मांडला जावा, अशी माझी अपेक्षा होती. संपूर्ण देशाची ती मागणी आहे. गरीब सामान्य जातीतील लोकांना आणि अल्पसंख्याकांचीही ती मागणी आहे, असं राहुल गांधी म्हणाले.








