
गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते प्रभासचा ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात कोणते कलाकार दिसणार? नेमके काय पाहायला मिळणार असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात येत होता. आता बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटातील त्यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमधील त्यांचा लूक पाहून तुमच्या अंगावर शहारे येतील. सध्या सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांचा इंट्रोडक्शन व्हिडीओ चर्चेत आहे.








