५० विमाने दिल्लीत लँड न होता आकाशातूनच फिरली माघारी… कारण काय?

0
20
५० विमाने दिल्लीत लँड न होता आकाशातूनच फिरली माघारी… कारण काय?


दिल्ली विमानतळावर गेल्या काही दिवसांत एक वेगळं चित्र होतं. देश-विदेशातून विविध शहरांमधून इथं आलेली विमानं बराच वेळ आकाशात घिरट्या घालून धावपट्टीवर न उतरताच माघारी फिरायची… अशाप्रकारे एक, दोन नव्हे तर गेल्या चार दिवसांत तब्बल पन्नास विमाने हवेतूनच माघारी फिरल्याने हजारो विमान प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीमुळं वातावरणात धुकं पसरल्याने दिल्ली विमानतळावरची दृष्यमानता खालावली होती. परिणामी अनेक पायलट्सना खाली विमानतळावरील धावपट्टी दिसत नसल्याने विमानं माघारी फिरत असल्याचं कारण सांगण्यात येत होतं. परंतु दिल्ली विमानतळाकडून प्राप्त झालेली आकडेवारी पाहिल्यास विमाने माघारी फिरण्यामागे धुक्याचं कारण पुढे केलं जात असलं तरी वेगळंच कारण पुढे आले आहे. नवीन तंत्रज्ञानानुसार वातावरणात दाट धुके पसरले असताना देखील विमान धावपट्टीवर सुरक्षितपणे अलगद उतरवता येतं आणि नेमके याचे प्रशिक्षण नसलेले पायलट् विमान चालवत असल्याने तब्बल ५० फ्लाइट्स परत गेल्याचं स्पष्ट  झालं आहे.



Source link