गृहमंत्री अमितशहा यांच्या उपस्थितीत यूनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (ULFA), आसाम सरकार आणि केंद्र सरकारमध्ये त्रिपक्षीय शातता करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. अमित शहा यांनी ULFA प्रतिनिधींना याचे श्रेय देताना म्हटले की, त्यांच्या प्रयत्नामुळेच हे शक्य झाले आहे. या कराराचे पालन केले जाईल. यावेळी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा उपस्थित होते. गेल्या १२ वर्षापासून केंद्र सरकार अरबिंदा राजखोवा यांच्या नेतृत्वाखालील या संघटनेशी चर्चा करत आहे. दहशतवादी संघटना ULFA चा एक गटअजूनही या शांतता करारात सहभागी नाही. त्याचे नेतृत्व परेश बरुआ यांच्याकडे आहे.








